* मराठी पत्रकार दिन व संस्थेचे अध्यक्ष जेपी सिंग यांच्या वाढदिवसाचा घातला संगम
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली येथील गुडलक चौकात असलेल्या भारती अकॅडमी इंग्लिश हायस्कूलच्या वतीने 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन व 11 जानेवारी संस्थेचे अध्यक्ष जेपी सिंग यांचा वाढदिवस याचे औचित्य साधत खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
चिंचवली शेकीन डीपी रोडवरील बहुजन संकल्प वृत्तपत्राच्या कार्यालयात भारती अकॅडमी इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता महाजन व त्यांच्या सहकारी हिना पेंढारी यांनी पत्रकारांचा शाल व गुलाब पुष्प देवून सत्कार केला.