अक्षता पाटील हिस एकविरा संस्था व बी. के. फाउंडेशनचा "भूमिकन्या सन्मान" पुरस्कार

 


वसई / प्रतिनिधी :- कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या पनवेल येथील एकविरा संस्था व बी. के. फाउंडेशन केळवणे (पनवेल) यांच्यातर्फे  "भूमिकन्या सन्मान 2025" सोहळ्यासाठी वसई पूर्व टिवरी गावातील अक्षता विजय पाटील हिस कला व  शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल  "भूमिकन्या सन्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.   

"भूमिकन्या  सन्मान 2025" सोहळ्याला "सुपली सोन्याची" फेम गायिका भागीरथी कोळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10. 30 वाजता, कराडी समाज हॉल, कामोठे गाव, सेक्टर 14, पनवेल येथे आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजक तेजस पाटील यांनी कळविले असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post