वसई / प्रतिनिधी :- कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या पनवेल येथील एकविरा संस्था व बी. के. फाउंडेशन केळवणे (पनवेल) यांच्यातर्फे "भूमिपुत्र सन्मान 2025" सोहळ्यासाठी वसईतील ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र एच. पाटील यांना पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "भूमिपुत्र सन्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
"भूमिपुत्र सन्मान 2025" सोहळ्याला "सुपली सोन्याची" फेम गायिका भागीरथी कोळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. हा सोहळा रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10. 30 वाजता, कराडी समाज हॉल, कामोठे गाव, सेक्टर 14, पनवेल येथे आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजक तेजस पाटील यांनी कळविले आहे.