खालापूर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


* खालापूर कोर्ट प्रांगणात महापुरुषांच्या प्रतिमेचे अनावरण

खालापूर / प्रतिनिधी :- 26 जानेवारी 2025 रोजी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त खालापूर कोर्ट प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. हे ध्वजारोहण खालापूर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश खंदारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर खालापूर कोर्ट प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज, महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

खालापूर कोर्टचे न्यायाधीश खंदारे साहेब, न्यायाधीश महोदया देशमुख मॅडम यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्ष ॲंड. संदेश साहेबराव धावारे, ॲंड. आनंद गायकवाड, युवा बारचे अध्यक्ष ॲंड. सतीश पवार, सरचिटणीस अँड. केदारी, ॲंड. टी. एम. शिंदे, ॲंड. येरुणकर,  ॲंड. दर्शन पाटणकर, ॲंड. मयूर कांबळे, ॲंड. सुरावकर,  ॲंड. शामिका दळवी, ॲंड. सरिता, ॲंड. स्मिता चोंगले - पाटील, ॲंड. मिलिंद गायकवाड, ॲंड. सचिन पवार, ॲंड. गजानन  पवार, ॲंड. अनिकेत विचारे, खालापूर कोर्टचे अनिस दळवी व संपूर्ण कोर्ट स्टाफ, खालापूर कोर्टमधील सर्व कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी, खालापूर कोर्टातील ज्येष्ठ मान्यवर सर्व वकील वर्ग उपस्थित होते.

युवा वकील संघटना खालापूर अधिकृत व खालापूर दिवाणी व फौजदारी न्यायालय संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post