अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोला दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रम व रोग्यांच्या नातेवाईकांना नाश्ताचे वाटप करण्यात येते. ठरल्याप्रमाणे प्रत्येक शनिवारी सकाळी अन्नदान करण्यात येते. त्याचबरोबर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उघड्यावर झोपलेल्या गोरगरिबांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येत असतो.
भारतमातेच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय अकोला येथे ध्वजवंदन व राष्ट्रगीतानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्येक वॉंर्डात जावून प्रत्येक रोग्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. तद्नंतर रोग्यांच्या नातेवाईकांना कचोरी व जिलेबीचे वाटप करण्यात आले. आज कचोरी व जिलेबी अविनाश कुंभार यांच्यातर्फे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सदस्य राजेश धनगांवकर, विवेक सातपुते, राहुल खंडाळकर, अविनाश कुंभार, प्रा. रवी अण्णा, देशमुख सर, गोपाल अवचार, कैलास हिवराळे आदी सदस्य उपस्थित हजर होते. या सर्वांचे विवेक सातपुते यांनी आभार मानले.