रायगड / याकूब सय्यद :- राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, पनवेल नवी मुंबई व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या कुष्ठरोग संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस ऐटलस) GIS Atlas पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रायगड पोलिस दलास देण्यात आलेल्या वाहनांचे व ड्रोनचे हस्तातरण यावेळी मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमानंतर मंत्री तटकरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.