* स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टचा उपक्रम
कर्जत / मानसी कांबळे :- येथील लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, हेल्थकेअर युनिट यांनी चिल्ड्रेन्स होप इंडियाच्या सहकार्याने कर्जतमधील 35 रायगड जिल्हा परीषद शाळा, आश्रम शाळांना नुकतेच नॉन इलेक्ट्रिक KENT वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण शाळांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आहे. दुषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचा धोका कमी करणे आणि निरोगी आरोग्य आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे असून या उपक्रमाचा फायदा कर्जत तालुक्यामधील ग्रामीण भागातील 35 शाळांना झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध झाले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण समुदायांवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करणे, आरोग्य, शिक्षण आणि जागरूकता यांना प्रोत्साहन देणे असल्याचे आयोजकांनी महटले आहे.
या कार्यक्रमाला कर्जत ब्लॉक शिक्षणाधिकारी संतोष दौंड, जागृती विभाग मुख्य व्यवस्थापक गौतम कनोजे, हेल्थ केअर विभाग सहाय्यक व्यवस्थापक डॉं. गीतांजली राव हजारे, पर्यावरण संवर्धन सहाय्यक व्यवस्थापक कन्हैया सोमणे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कर्जतमधील 35 रायगड जिल्हा परीषद शाळा, आश्रम शाळांना नुकतेच नॉन इलेक्ट्रिक KENT वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हेल्थकेअर कर्जत युनिटच्या मेडिकल ऑफिसर डॉं. सुजाता मिनमिणे, नर्स सारिका वेहेले, मेडिकल सोशल वर्कर केशव कवठे, कम्युनिटी मोबिलायझर मयूर पदिर, डाटा एंट्री ऑपरेटर मयुरी देशमुख आणि मल्टीपर्पज वर्कर मनोज मुकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका सचिन वेहेले यांनी तर आभार डॉं. सुजाता मिनमिणे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी जागृती टीमने देखील सहकार्य केले.
