खोपोली नगर परिषद हद्दीत होर्डिंग, बॅनरबाबत जागा निश्चित

  


* अनधिकृत जाहिराती होर्डिंग, बॅनरबाबत संबंधितांकडे तक्रारी कराव्यात - मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील

खोपोली / खलील सुर्वे :- मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नगर परिषद हद्दीमध्ये अनधिकृत आकाश चिन्हे, होडींग्स, पोस्टर्स, कमानी, जाहिराती आदी लावण्यात येणाऱ्या जाहिरांतीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी दिली आहे. 

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार खोपोली नगर परिषदेने जाहिरांतीसाठी किंवा बॅनर लावण्याकरीता जागा निश्चित केलेल्या आहेत. त्यात  नगर परिषद कार्यालय खोपोली बस पार्किंग एरिया...जुनी नगर परिषद कार्यालय खोपोली बाजूला...डॉं. बाबासाहेब आंबेडकर चौक...नगर परिषद हॉस्पिटल...4 जंक्शन साई रिव्हर रिसोर्टजवळ...रेस्ट हाऊस जवळ (लखाणी बिल्डर)...हायको कॉर्नर (गेट जवळ)...पाटणकर चौक...राजेश्री शाहू महाराज नाट्यगृह चौक...या ठिकाणी अधिकृत होर्डिंग लावण्याबाबत जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या 9 जागांवर नगर परिषदेची रीतसर परवानगी घेऊनच जाहिरात होर्डिंग / बॅनर लावण्यात यावे. यावर कारवाई करण्याकरीता क्षेत्रीय अधिकारी, भरारी पथक, नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

गौतम मोरे नोडल अधिकारी तथा स्वछता निरीक्षक खोपोली नगर परिषद मोबाइल क्र. / SMS क्र. / whatsapp क्र. 9561742828...शिवा चिन्नास्वामी भरारी व निष्कासन पथक तथा स्वछता निरीक्षक खोपोली नगर परिषद...सेल्वदुराई शेटू भरारी व निष्कासन पथक तथा स्वछता निरीक्षक खोपोली नगर परिषद...सचिन घरत नोडल अधिकारी तथा पोलिस हवालदार खोपोली पोलिस स्टेशन मोबाइल क्र. 9423377404, तरी अनाधिकृत जाहिराती होर्डिंग /बॅनरबाबत काही तक्रारी असल्यास नगर परिषदेच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 5990 2424 तसेच नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post