समस्याग्रस्त कर्जतकरांचे पुन्हा आंदोलन

 

* नगर परिषद विरोधात कर्जत शहर बचाव समितीचे  १६ डिसेंबरपासून उपोषण

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत नगर परिषद हद्दीतील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आल्यामुळे आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कर्जत शहर बचाव समितीने १६ डिसेंबर २०२४ पासून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने यापूर्वी २५ सप्टेंबर आणि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी समस्यांवर उपाययोजनांसाठी निवेदने सादर केली होती, मात्र ठोस कृती न झाल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. समितीने प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास जबाबदार धरले आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीत कर्जत शहर, मुद्रे, दहिवली, गुंडगे, भिसेगाव या परिसरात भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मात्र, पाण्याची समस्या सर्वच भागात सामान्य (कॉमन) समस्या बनली आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा आणि गलिच्छ कारभाराचा त्रास शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा होत आहे. या आणि अशा अनेक नागरी समस्या घेऊन नगर परिषद प्रशासन विरोधात गेल्या काही महिन्यापासून लढा देत आहेत. समाधानकारक काम न झाल्यानेच कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने १६ डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ॲंड. कैलास मोरे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post