खालापूर / सुधीर देशमुख :- खालापुर तालुका भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक नुकतीच खिरकंडी येथे माजी सरपंच व तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांची घोषणा झाली. या आनंदाच्या क्षणी प्रभारी खालापुर तालुका अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती जाहीर केली.
सनी यादव यांची भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठवड्यात जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व आमदार प्रशांत ठाकुर यांनी ही जबाबदारी सोपवली होती. त्याची घोषणा आज करण्यात आली. तालुक्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नविन जबाबदारी व जोमाने कामाला लागण्यासाठी तडफदार व धडाडीने तालुक्यात काम करणारा असा कार्यकर्ता सनी यादव ज्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ही यशस्वीपणे कामगिरी पार पाडली. खालापुर तालुक्यातले असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकजुटीने, प्रामाणिकपणे एकसंघ ठेऊन खासदारकी व आमदारकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार नसताना महायुतीच्या धर्माचे पालन करत कुठेही कार्यकर्त्यांत नैराश्याची भावना निर्माण होऊ दिली नाही व वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करीत आजपर्यंत सर्व जबाबदारी पार पाडत आले आहेत.
शांत, हसतमुख, प्रेमळ स्वभाव...कार्यकर्तांना सांभाळून घेणारा व त्यांच्या समस्या जाणून घेणारा असा हा कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष अशा प्रवासात विविध जबाबदारी पक्षाने दिली ती प्रामाणिकपणे आजपर्यंत त्यांनी सांभाळली व त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तालुका अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत यापुढे नविन सभासद नोंदणी अभियान, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस यश संपादन करणार अशी आशा व्यक्त केली आहे.
ह्याप्रसंगी व्यासपिठावर रायगड जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, माजी सभापती नरेश पाटील, प्रभारी खालापुर तालुका अध्यक्ष सनी यादव, माजी सरपंच व तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव, हेमंत पाटील, तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, युवा उपाध्यक्ष प्रसाद पाटील, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुजाता दळवी, माजी उपसभापती वत्सला मोरे, तालुका सरचिटणीस निकीता हेलंडे, सुप्रिया तटकरे, यशोदा मोरे, सुजाता देशमुख, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील, जगदीश आजिवले, विशाल लोते, महेश कडू, भरण महाडीक, आबा देशमुख, हरीभाऊ जाधव, संदिप मोरे, मोहन घाडगे, राकेश जाधव, मयुर पाटील सावरोली आदी उपस्थित होते. पं. समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर परांगे यांनी सूत्रसंचालन व नागेश पाटील यांनी आभार मानले.
