* सुशांत चव्हाण यांचा जिल्हा परिषदमधून शिक्षण ते आयईएस ऑफिसर (I.E.S officer) असा प्रवास
माळशिरस / प्रतिनिधी :- आपल्या विक पाईंट (weak points) ला स्ट्रोग पाईंट (strong point) बनवून जीवनात जे पाहिजे ते मिळवायचे आणि त्यासाठी काहीही करण्याची जिद्द बाळगणारे सुशांत नारायण चव्हाण यांना बापूराव मुळीक व हनुमंत मुळीक या दोन्ही मामांची मोलाची साथ व मार्गदर्शन लाभले.
त्यांचे शिक्षण अंगणवाडीपासून शिंदेवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदेवाडी या ठिकाणी चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झाले. नंतर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे, हनुमान विद्यालय शिंदेवाडी या ठिकाणी झाले. उच्च माध्यमिक शिक्षण तुळजाराम चतुरचंद विद्यालय (T. C. COLLEGE) बारामती या ठिकाणी झाले. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली या ठिकाणी बी. ई. या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. ते करत असताना गेट्सची परीक्षा दिली. त्यामध्ये यश प्राप्त करून नंतर IIT मुंबई (पवई) या ठिकाणी पूर्ण केले. नंतर त्यांनी डॅनफॉस / ईटान इंडिया लिमिटेड या कंपनीत चार वर्ष जॉब करत यूपीएससीचा खडतर अभ्यास केला व हे यश संपादन केले.
शिंदेवाडीमधील तरूण मुलामुलींना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-यांसाठी सुशांतने एक आदर्शच निर्माण केला आहे. त्याबद्दल त्याचे दोन्ही मामा व शिंदेवाडी पंचक्रोशीतील नागरीक यांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला. सुशांत चव्हाण यांच्या सत्कार समारंभात माजी आमदार आर. जी. आप्पा रुपनवर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन समस्थ ग्रामस्थ व उपस्थित सर्वांना झाले. त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती सुशांत चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करीत असताना प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असताना आलेल्या सर्व अनुभवाचे सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले व आपण मिळविलेल्या यशाबद्दल विस्तृतपणे मुद्देसुद विचार व्यक्त केले.
माजी विधान परिषद सदस्य आप्पासाहेब रुपनवर, डायरेक्टर कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज ॲंड. प्रदीप शिंदे, अमोल घाडगे, विनोद रणवरे, छगन शिंदे, चंद्रकांत शिंदे, संजय भगत, अभिजीत शिंदे, पांडुरंग जाधव, विठ्ठल कदम व ग्रामस्थ शिंदेवाडी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सुशांत नारायण चव्हाण यांचा भव्यदिव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार समारंभ हनुमान विद्यालय शिंदेवाडी या शाळेवर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिंदेवाडी पंचक्रोशीतील पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच महिला मंडळी उपस्थित होते.