माळशिरस / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) राष्ट्रीय सरचिटणीस डॉं. राजेंद्र गवई यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जकापा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) माळशिरस तालुक्याच्या वतीने परभणी येथील भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाला व त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे, त्याच्या पाठीमागच्या सूत्रधारावर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार माळशिरस यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत नानासाहेब सावंत, दत्ता सावंत,जिल्हा कार्याध्यक्ष वैभव भैया धांईजे, माळशिरस तालुका अध्यक्ष रमेश साळवे, एडवोकेट नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संजय धांईजे, जिल्ह्याचे जेष्ठ नेते नारायण समिंदर, तालुका उपाध्यक्ष महादेव समिंदर, तालुका सचिव गोविंद धांडोरे, तालुका खजिनदार गणेश करमाळकर, तालुका कार्याध्यक्ष भालचंद्र यादव, अमित सावंत, रोहित धांईजे, बाबा वाघमारे, बापू ओहाळ, शंकर वाघमारे, आदेश धांईजे आदी उपस्थित होते.