* काकीला सांगा, मामाला सांगा या लोकप्रिय प्रचाराचे जनक खोपोलीचे भावी नगराध्यक्ष डॉं. शेखर जांभळे यांनी उडवून गेली प्रचारात धमाल
खोपोली / प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकीत आप पक्षामध्ये असताना संजोग वाघेरे यांचा केलेला प्रचार...संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. 24 वर्ष समाजकारणात आगळावेगळा ठसा असणारे डॉं. शेखर जांभळे यांना खोपोली व पंचक्रोशीत मानणारा चाहता वर्ग आहे. डॉं. शेखर जांभळे यांच्या नेतृत्व गुणाची चमक ओळखून आपच्या माध्यमातून आमदारकी न लढता शिवसेना पक्षात येऊन शहराचा विकास करावा असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्यावर ठोस समाजकार्य करण्याची मनीषा बाळगून असणारे डॉं. शेखर जांभळे यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर स्वतःच्या इच्छेचा त्याग करीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
कर्जत-खालापूर विधानसभेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात जीव ओतून काम केले. प्रचारात मग्न असलेले डॉं. शेखर जांभळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे 300 पेक्षा जास्त सहकारी यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर राजीनामा देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी अहोरात्र काम केले. खोपोली विभागातून मिळालेले 6000 पेक्षा जास्त मताधिक्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.
या यशात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे निर्भळ यश असून डॉं. शेखर जांभळे यांचे नेतृत्व कर्जत खालापूरकरांना नक्कीच लक्षात राहील. प्रचारात शासनाच्या योजना कल्पकतेने सांगून मने जिंकणारे डॉं. शेखर जांभळे हे नक्कीच किंगमेकर आहेत असे म्हटल्यास वावगे ठरु नये. अगदी कमी काळात आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी बनलेले डॉं. शेखर जांभळे भविष्यात खोपोली नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द अविस्मरणीय असेल यात वादच नाही.
