खोपोली / मानसी कांबळे :- कर्जत विधानसभा मतदार संघात 2900 कोटी रूपयांचा आणलेला निधी...मतदार संघातील महिलांना 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेचा लाभ मिळावा, यासाठी घरोघरी जावून घेतलेले परिश्रम...कर्जत व खोपोली शहराच्या विकासाला दिलेले प्राधान्य...नियोजनबध्द प्रचार, यामुळे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील जनतेने आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. या विजयात शिवसैनिक तथा पत्रकार अमित भोपतराव यांचाही खारीचा वाटा राहिला आहे. नियोजनबध्द प्रचार रणनिती आखत तसेच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करीत अमित भोपतराव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याला खोपोली, खालापूर व कर्जत तालुक्यातील घराघरात व मतदारांच्या मनामनात पोहचविले...ज्याची पोचपावती म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना नागरिकांनी भरभरून मतदानरूपी आशिर्वाद दिले.
अमित भोपतराव यांनी खोपोली शहरात प्रमाणिकपणे... कोणत्याही आमिषाला बळी न पडता काम केले...आज खोपोली शहरातील मतदारांनी भरघोस 'मत' दिल्याने आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झाले आहेत. खोपोली शहरातील जबाबदारी सांभाळत तसेच विश्वासू सहकारी म्हणून शहरातील एक ना एक वॉर्ड पिंजून काढून आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारामध्ये अमित भोपतराव यांनी सक्रिय म्हणून जबाबदारी सांभाळली. आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी म्हणून खोपोली शहराची जबाबदारी योग्य रितीने व नियोजनबध्द पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवून प्रचार करण्याचे काम अमित भोपतराव यांच्याकडून करण्यात आले आणि त्याचेच फलित म्हणून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे मंत्री व्हावेत अशी इच्छा देखील अमित भोपतराव यांनी व्यक्त केली आहे.
आमदार महेंद्र थोरवे विकासपुरूष आहेत... कर्जत-खालापूर मतदार संघाचा त्यांनी कायापालट केला आहे...दुसऱ्या विकास पर्वात देखील आमदार महेंद्र थोरवे विकासाची गंगा खोपोली शहरासह कर्जत-खालापूर मतदार संघात खेचून आणतील तरी आगामी खोपोली नगर परिषद, खालापूर पंचायत समिती, कर्जत पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली देखील महायुती घवघवीत यश मिळवेल.. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना लाल दिव्याची गाडी देण्यात यावी...आगामी मंत्री मंडळात त्यांचा समावेश व्हावा अथवा महामंडळ तरी त्यांना देण्यात यावे, अशी इच्छा अमित भोपतराव यांनी व्यक्त केली आहे.
