महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई / प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तसेच अभिनंदन करण्यात आले. 

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महेंद्र थोरवे हा आमचा वाघ आहे. निवडणुकीच्या काळात अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जात असताना तो कधीच घाबरला नाही. त्याच्या जिद्दीच्या जोरावर त्याने पुन्हा कर्जत-खालापूरकरांची मने जिंकली आहेत. कर्जत-खालापूरकरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो की तुम्ही शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला आणि महेंद्र थोरवे यांना पुन्हा संधी दिली. तुम्हा सगळ्यांचा विश्वास महेंद्र थोरवे दुपटीने विकासकामांतून सार्थ ठरवेल, याची मला खात्री आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनी सर्व उपस्थितांचा उत्साह वाढविला. आमदार महेंद्र थोरवे यांनीही मतदारांचे आभार मानत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

Post a Comment

Previous Post Next Post