वसमत / प्रतिनिधी :- बालाजी अस्थि व्यंगशाळा वसमत येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शेख मोईन होते. प्रमुख पाहुणे समतादूत मिलिंद आळणे हे होते.
सर्वप्रथम हेलन केअर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शेख मोईन सर यांनी दिव्यांग दिनानिमित्त शाळेतील मुलांना दिव्यांगाबद्दलची सर्व माहिती व त्यांच्यात हर्षोल्हास निर्माण करून समाजात दिव्यांग व्यक्ती कशाप्रकारे कार्य करू शकतात, याची माहिती सांगितली. दिव्यांग मुले-मुली ह्या सुद्धा सर्व मुला-मुलींसारखे शाळा शिकू शकतात. शाळेचे कलाशिक्षक पाईकराव सर, कदम सर, तोंडसुरे सर, शिंदे सर, सचिन वंजारे, सफाईगार बल्लेवाड रामकिशन यांनी परिश्रम घेतले. आभार अशोक पाईकराव सर यांनी मानले.