भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने समतादुत मिलिंद आळणे यांचा राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

वसमत / प्रतिनिधी :- रुग्ण हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार बार्टीचे समतादुत मिलिंद आळणे यांना संविधान दिनाचे औचित्य साधून परभणी येथील पत्रकार भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार सामाजिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा वसमत यांच्यावतीने मिलिंद आळणे यांचा सत्कार हर्षनगर येथील संबोधी बुद्ध विहारात अॅड. रणधीर तेलगोटे, जेष्ठ मार्गदर्शक सुनील काळे, भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष मेजर भगवानराव सुर्यतळ, बौद्धाचार्य दौलतराव गजभार गुरुजी, रघुपती सरोदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संभाजी कसबे, भिमराव शेळके, इंजिनिअर दिलीप कांबळे, डॉं. एन. के. मुळे, नामदेवराव इंगोले, आर. एस. नंद,  प्रणव आळणे, आराधना आळणे, तालुका अध्यक्ष बालाजी मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post