आमदार महेंद्र थोरवे मंत्री व्हावेत अशी खोपोलीकरांची इच्छा !

* शिवसैनिकांकडून विविध ठिकाणी नवस 

खोपोली / फिरोज पिंजारी :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करणारे 'विकासपुरूष' अशी प्रतिमा असलेले महेंद्र सदाशिव थोरवे अर्थात कर्जत-खालापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे मंत्री व्हावेत, अशी इच्छा कर्जत, खालापूर सह खोपोली शहरातील लाखों नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनेक नेते, शिवसैनिक व आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून यासाठी नवस देखील करण्यात येत आहेत...आमदार थोरवे मंत्री झाल्यास कर्जत-खालापूर मतदार संघाचा कायापालट होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे व महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचा दारूण पराभव केला. आपल्या पहिल्या टप्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत-खालापूर मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलवून टाकला आहे. 'न भूतो न भविष्यती' असा अद्भूतपूर्व विकास या मतदार संघात झाला आहे. कर्जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह विविध विकासकामे तसेच खालापूर व खोपोली शहरातील वॉर्डनिहाय कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गी लावली आहेत. 2900 कोटींपेक्षा जास्त रूपयांचा निधी आणत मतदार संघाचा कायापालट करणारे विकासपुरूष आमदार महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाल्याने महायुतीसह शिवसेना व नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. 

दरम्यान, विकासाची दुरदृष्टी असणारे नेतृत्व...युवकांचे आधारस्तंभ...सबका साथ, सबका विकास अशी धारणा असणारे...युवा, निर्भिड, खंबीर असे नेते...हिंदु आणि हिंदुत्वाचे रक्षणकर्ते...सर्व समाजांचा आदर करणारे आमदार महेंद्र थोरवे आगामी मंत्री मंडळात सहभागी व्हावे आणि गेल्या अनेक वर्षांचा कर्जत-खालापूर तालुक्यातील 'लाल दिव्याच्या गाडी'चा दुष्काळ संपावा... कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाला देखील राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा कर्जत-खालापूर सह खोपोली शहरातील शिवसैनिक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post