विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संविधान दिन साजरा

पुणे / प्रतिनिधी :- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी "संविधान सन्मान दिन" महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉं. विजय केसकर, उपप्रचार्य ज्ञानेश्वर गुळीग, विद्यार्थी विकास अधिकारी डॉं. रामचंद्र पाखरे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी राजेंद्रकुमार डांगे, सेवक रघुनाथ लोहार उपस्थित होते. यानंतर साद फाउंडेशन इंदापूर आयोजित "संविधान सन्मान दौड" यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 20 विद्यार्थी व 5 प्राध्यापक सहभागी झाले होते.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय टिळकेकर, श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर प्राचार्य कुंभार सर, भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी वालचंदनगर प्राचार्य क्षीरसागर सर, साद फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज वंसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर डॉं. बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्मारक समिती वालचंदनगर या ठिकाणी पदयात्रा काढून डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. सुवर्णा बनसोडे, प्रा. अस्मिता चांदगुडे, प्रा. कपिल कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.   

त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी गोविंद प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा एकशिव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना "संविधान सन्मान दिनानिमित्त" शालेय वस्तूंचे वाटप केले. यावेळी श्रुती साबळे, विद्या भोसले, सौरभ नवगण, दत्ता जाधव, सोनू साळुंखे, रणजीत वाघमारे हे विद्यार्थी उपस्थित होते. अतिशय स्तुत्य असा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबवून आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


Post a Comment

Previous Post Next Post