भाजपा खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आदिवासी बांधवांना साहित्याचे वाटप

 


* जिल्हा परिषद शाळा तूरमाळ येथील विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारा शैक्षणिक साहित्य

खालापूर / प्रतिनिधी :- भाजपा खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने दूरशेत  ग्रामपंचायत हद्दीतील तुरमाळ येथील आदिवासी बांधवांना लोकोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर तुरमाळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारा शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे कबूल केले. यावेळी आदिवासी बांधवांना खूप आनंदी व चेहऱ्यावर समाधान दिसून आले. राजकीय क्षेत्रात कमी वेळात युवा नेतृत्व म्हणून काम करणाऱ्या सनी यादव यांनी असेच सामाजिक उपक्रम करत रहावे, असे वक्तव्य प्रल्हाद केणी यांनी करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख प्रल्हाद केणी , खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष हरिभाऊ जाधव, खालापूर शहर अध्यक्ष  दिपक जगताप, शक्तिकेंद्र प्रमुख मोहन घाडगे, बुध अध्यक्ष निलेश साळुंखे, तालुका संयोजक सोशल मीडिया अनिकेत साळुंखे, सांजगाव पंचायत समिती उपाध्यक्ष शुभम सकपाळ, उद्योजक कुणाल शिंदे, गाव प्रमुख सुरेश साळुंखे, उद्योजक प्रणित साळुंखे, उद्योजक विजय साळुंखे, उद्योजक उदय साळुंखे, कल्पेश साळुंखे, पांडुरंग हिरवे, ज्ञानेश्वर पगारे, संजय साळुंखे, संतोष साळुंखे, प्रवीण मुसळे, पांडुरंग पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post