इशिका शेलार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

 


नवी मुंबई / प्रतिनिधी :-
पारस काव्य, कला, जनजागृती संस्थेतर्फे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजरत्न पुरस्काराने इशिका शेलार यांना सन्मानित करण्यात आले.

सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे. समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे. कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचे अंत्यविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नि:शुल्क जेवणाचे डबे पुरविताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालविलेली निसर्ग शाळा ही समाजासाठी मैलाचा दगड ठरली आहे. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून सलग 4 वर्ष पार पडलेले जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका बजावताना संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 6 वर्षांपासून पुरविण्यात येणारे दोन वेळचे नि:शुल्क भोजन व खोपोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्गरथ सेवा चालविण्यात अग्रेसर आहेत. लैंगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन, समाज जागृतीमध्ये अग्रेसर आहेत. याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथील प्रसिध्द, ताज हॉटेल येथेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

रायगड पोलिस यांच्या वतीने 25 ऑक्टोबर 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा नवदुर्गा या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इशिका शेलार यांचा शिवसेना (उबाठा गट) कर्जत-खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशनच्या वतीने दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत येथे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सन्मानाने सन्मान करण्यात आले होते. खालापूर तहसील, पंचायत समिती खालापूर तसेच खोपोली नगर परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आल्या आहेत. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे शानदार कार्यक्रमात IEA च्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात डायरेक्टर धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्मानिय व्यक्ती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या सर्व कार्याची नोंद घेवून रायगड पोलिस दलातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 च्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉं. योगेश म्हसे, रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला व पोलिस महिला यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. समाजाचे ऋण मानून कार्यरत राहताना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सहज सेवा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा तसेच खोपोली पोलिस संचलित महिला दक्षता कमिटीच्या इशिका शेलार यांनी व्यक्त केला आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मान्यवरांनी भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post