* अपघातात टेम्पोचालक जखमी तर टेम्पोची केबिन चक्काचूर
खोपोली / खलील सुर्वे :- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर तसेच जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सकाळी 6 वाजेच्या सुमारास टेम्पो क्र. MH45-1920 या टेम्पोची पाठीमागून समोरील वाहनास जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक सुरेश मोहिते (वय 31) रा. पंढरपूर टेम्पोची केबिन दबल्याने चालक टेम्पोच्या केबिनमध्ये अडकला होता.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य आणि स्थानिक युवकांनी मदतकार्य करीत टेम्पो चालक सुरेश मोहिते याला केबिनमधून बाहेर काढले व पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्समधून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठविण्यात आले. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार झोप लागल्याने पुढील वाहनास पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य आणि स्थानिक युवकांनी मदतकार्य केले.