उंबरखिंडच्या ऐतिहासिक लढाईचा 363 वर्षाचा इतिहास!

 


खालापूर / मानसी कांबळे :- खालापुर येथील छावणी येथे असलेल्या उंबरखिंड येथील लढाईचा इतिहास जाणून घेण्यासाठी हजारों पर्यटक, शाळेतील विद्यार्थी यांच्या क्षेत्रभेट या ठिकाणी होतात. येथील इतिहास म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः एकूण 27 महत्वपूर्ण लढायांमध्ये भाग होता. त्यातील उंबरखिंड ही महत्वपूर्ण लढाई आहे.    

समरभुमी उंबरखिंड इतिहास हा 363 वर्षापूर्वीचा आहे. सन 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कारतकब खान, रायतबागन खान याच्यासह तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला. औरंगजेब ने कोकण किनारपट्टी काबीज करण्यासाठी आंबेनळी उंबरखिंड मार्गे उतरणार हे महाराजांना समजताच त्यांनी स्वराज्य सरसेनापती नेताजी पालकरांना पुढे जावून छावणी टाकण्यास सांगितले. सैन्य उंबरखिंडीचा मार्गांत दबा धरून बसले होते. खानाचे सैन्य उंबरखिंडीत उतरताच एका बाजुने नेताजी पालकर आणि दुसऱ्या बाजुने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. या लढाईचे वैशिष्ट्य होते की, कमी सैन्याने प्रचंड शत्रुंचा गनिमी काव्याने पराभव केला होता. 2 फेब्रुवारी 2025 रोजी या घटनेला 363 वर्ष पूर्ण होत आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post