* परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांचा विश्वास
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांना स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. "परिवर्तनाची लढाई, आपण जिंकणारच" या घोषवाक्यासह सुधाकर घारे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.
कर्जत आणि खालापूर परिसरात परिवर्तन घडविण्यासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी यंदा सुधाकर घारे यांना जिंकवून आणायचे असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
या निवडणुकीत ऑटो रिक्षा हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, सुधाकर परशुराम घारे "परिवर्तनाची लढाई, आपण जिंकणारच" असे ब्रीदवाक्य घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मतदारांमध्ये त्यांच्या विजयानंतर अपेक्षित असलेल्या बदलांविषयी उत्सुकता दिसून येत आहे.
सुधाकर परशुराम घारे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि समर्थक करीत आहेत, जेणेकरून कर्जत-खालापूर परिसरात आवश्यक तो विकास आणि परिवर्तन साधता येईल.