भिसेगावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

 

* अमोघ कुळकर्णी यांच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश 

* भिसेगावात वाढली शिवसेनेची ताकद

कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत भिसे गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला तसेच अमोघ कुळकर्णी यांच्यासोबत भिसेगावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.   

शुक्रवारी संध्याकाळी पोसरी येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये भिसे गावातील अमोघ कुळकर्णी विकास लाड, रमेश नाना देशमुख तसेच सटू आई येथील अस्मिता घोडविंदे, आमराई येथील मनसेचे शहराध्यक्षा भारती कांबळे तर मीनाक्षी जुनघरे, आदिवासी वाडीतील सुंदर वाघमारे सह वाडीतील आदिवासी, क्रांतीनगर फातिमानगर येथील ग्रामस्थांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यज्ञेश भागवत, रवी भोईर, पुंडलिक दिसले, अशोक दिसले, नाथा हजारे, प्रसाद नवघणे आदींनी प्रवेश केला. 


 

यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, माजी तालुकाप्रमुख बाळाजी विचारे, संभाजी जगताप, शिवराम बदे, मा. नगरसेवक संकेत भासे, शहर संपर्क प्रमुख ज्योती कुळकर्णी, नारायण जुनघरे, मोहन भोईर, मिलिंद दिसले, तेजस गायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अमोघ कुळकर्णी यांचा पक्षप्रवेश झाल्याने नक्कीच अजून ताकद वाढली आहे तसेच पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी संतोष भोईर यांनी भिसे गावातील समस्या सोडविले जातील तसेच गावठाणातील घरे नियमकुलीत केले जाईल तसेच शबरी योजना राबविल्या जातील. सटू आई येथील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविले जाईल, अशी ग्वाही जिल्हाप्रमुख भोईर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post