खोपोली / प्रतिनिधी :- शिवसेनेचे खोपोली उपशहर उपप्रमुख आकाश शोभा शंकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोहनवाडी, खोपोली येथील युवकांचा दि. 3 नोव्हेंबर 2024 रोजी शिवतीर्थ, कर्जत येथे कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, शिवसेना वैद्यकीय व रोजगारचे रायगड जिल्हाप्रमुख डॉं. शेखर जांभळे, खोपोली उपशहर प्रमुख दिनेश थोरवे, युवा सेना सचिव रुपेश देशमुख, गणेश खानविलकर, ईश्वर कासार आदी उपस्थित होते.
सातत्यपूर्ण प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढत असून खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून प्रचंड मताधिक्य मिळेल असा आशावाद शिवसेनेचे खोपोली शहर उपप्रमुख आकाश कांबळे यांनी व्यक्त केला आहे.