कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कळंब ग्रामपंचायत हद्दीतील वारे येथील बौद्ध वाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवार, दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शांताराम जाधव, महेंद्र जाधव, हिराबाई जाधव, सुजाता जाधव, मनीषा जाधव, सुवर्णा जाधव, नलिनी सोनवणे, वैशाली जाधव, स्नेहा जाधव, केतकी जाधव, प्रियंका जाधव, सायली जाधव, सागर म्हसे, अजय म्हसे, महेश मस्के, विजय चौरे, सचिन जाधव, सानिका जाधव यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, विधानसभा प्रमुख युवा सेना प्रसाद थोरवे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.