* आ. महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी महायुतीचे नेते व कार्यकर्ते लागले कामाला
कर्जत / प्रतिनिधी :- शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व घटक पक्षाचे कर्जत-खालापूर मतदार संघाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवतीर्थ पोसरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत संपर्क प्रमुख विजय पाटील, जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख संभाजी जगताप, कर्जत तालुका प्रमुख सुदाम पवाळी, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, संघटक शिवराम बदे, माजी सभापती मनोहर थोरवे, महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे, उप जिल्हा प्रमुख निलम चोरगे, आरपीआय कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वसंतशेठ भोईर, जिल्हा सचिव रमेश मुंडे, दिपक बेहेरे, सनी यादव, आरपीआय तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, अविनाश कांबळे, महेंद्र धनगावकर, बाळाजी विचारे, दिलीप ताम्हाणे, गज्जू भाई वाघेश्वर, अरुण देशमुख, सुनील ठाकूर, सनी चव्हाण, मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, गणेश पालकर, त्याचप्रमाणे महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी, महिला वर्ग उपस्थित होते.
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा राजिपचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेना ठाकरे गटाचे राजीपचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे, खोपोलीचे मा. नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अल्पसंख्यांक आघाडी महिला महासचिव जैबुन्निसा शेख, रायगड जिल्हा उपाध्यक्ष फरीदा शेख, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष मुस्कान सैय्यद, खालापूर तालुका संपर्क प्रमुख हमीद शेख, माजी खोपोली शहर प्रमुख राजन सुर्वे, माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे, मनसे महिला खालापूर तालुका अध्यक्ष पूजा धारणे, नेरळ मा. सरपंच सुवर्णा नाईक, नेताजी टोकरे त्याचप्रमाणे भाई शिंदे यांचे पाच भाऊ व शेकडो कार्यकर्ते व महिला वर्गांने आमदार महेंद्र शेठ धोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. मुख्यमंत्री यांनी राज्यात शिवसेना रुजवली, वाढवली, २०१९ साली जशी शिवसेना लढली, झटली व मला निवडून देवून भगवा फडकवला, तसेच पुन्हा एकदा शिवसैनिकांची वज्रमूठ तयार झाली आहे, आपण सर्व महायुतीतील मित्रपक्षांनी एकत्रित येवून काम करून विजयी होणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे तिन्ही नेते काम करीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जतमध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गाफील राहू नका, सर्व ताकदीने लढा देवून मते द्या, मा. आमदार सुरेश लाड भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, याचा फायदा महायुतीला होणार आहे, पुन्हा एकदा २३ तारखेला दिवाळी साजरी होणार, असे भाकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली. शिवतीर्थ ही वास्तू पवित्र आहे, येथून आम्ही एल्गार करीत आहोत, पुन्हा एकदा भगवा फडकवा...येथील विरोधकांची कीव येते, अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले की, रिक्षावाले होते तेच मुख्यमंत्री झाले, मी जरी रिक्षा चालवित होतो, तरी भी प्रामाणिक होतो, आज मी आमदार म्हणून उभा आहे, मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत, मला रिक्षावाला म्हणून हिणवले, पण तीच रिक्षा निशाणी घेवून तुम्ही मदारांना सामोरे जाणार आहात, मात्र तेच रिक्षावाले बांधव तुम्हाला चारी मुंड्या चीत केल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा त्यांनी या मेळाव्यात दिला.
शिवसेनेत रोज पक्षप्रवेश होत आहेत, पक्षाची ताकद वाढत आहे, आता तिसरी निवडणूक मी लढत आहे, माझ्या विकास कामांची पावती मला पुन्हा येथील मतदार देणार आहेत, पुन्हा या मतदार संघाचा आमदार म्हणून मला निवडून देणार, याची मला खात्री आहे. या मतदार संघात महायुतीत राहून गद्दारी करणाऱ्या उमेदवार व नेत्याची हकीकत मला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सांगायची आहे, म्हणून गाफील राहू नका, बुथवर आपली लढाई झाली पाहिजे, ही लढाई सर्वांची आहे, आमदार महेंद्र थोरवे यांनी माघार घेतलेले भाजपचे प्रमुख किरण ठाकरे यांना एकत्र येवून काम करावे, अशी भावनिक हाक दिली. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता झटला पाहिजे, येणाऱ्या २३ नोव्हेंबरला गुलाल आपल्याच अंगावर पडून आपण सर्वांनी विजयोत्सव साजरा करण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी याप्रसंगी केला. यावेळी दोन्ही तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.