* अपघातात टेम्पोची केबिन दबल्याने चालक जखमी
खोपोली / प्रतिनिधी :- मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मुंबई लेनवर किमी 40.100 दरम्यान टेम्पोने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला आहे.
पुणेहुन मुंबईकडे जाणारा टेम्पो (नं.;MH05 , DK8062) वरील चालक अफसर अली खान (वय 28) (रा. जरीमरी, अंधेरी, एअरपोर्ट रोड मुंबई) हा टेम्पो पुणेकडून मुंबई दिशेने घेऊन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोची पाठीमागून समोरील ट्रक (क्र. MH46CL, 1666) ला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोची केबिन दबल्याने चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या सर्वांनी मिळून दोन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमजीएम कामोठे पनवेल येथे रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा - बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली व दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली.