सुभाषनगर करांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत उभे रहावे!

 

* प्रचार रॅलीतून महायुतीच्या नेत्यांचे आवाहन 

खोपोली / फिरोज पिंजारी :- आमदार महेंद्र थोरवे यांनी सुभाषनगर संरक्षण भिंतीसाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याने शेकडो लोकांचे जीवन सुरक्षित होणार आहे. सुभाषनगरसह वासरंग, लौजी, तांबडी, साईबाबानगरच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे नेहमीच प्रयत्नशील आहेत, तरी सुभाषनगरच्या ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांना आगामी 20 नोव्हेंबर रोजी भरभरून मतदान करावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता हळूहळू चढू लागला आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती व मित्र पक्षाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची प्रचार रॅली आज, दि. 9 नोव्हेंबर रोजी सुभाषनगर परिसरात पोहचली. यावेळी महायुतीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याचा आढावा वाचत धनुष्यबाण चिन्हाचे बटण दाबून आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी सुभाषनगर करांनी सहकार्य करावे, असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले. 


Post a Comment

Previous Post Next Post