* कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात अर्ज दाखल
रायगड / प्रतिनिधी :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि. 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघापैकी कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात तीन उमेदवारांची पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
* नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :-
189 - कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते सुधाकर परशुराम घारे (अपक्ष).
190 - उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष).
193 - श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते आदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी).
जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि. 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि. 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि. 20 नोव्हेंबरला होत असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.