मी सुधाकर घारे...देवमाणूस

 

* शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

खोपोली / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुधाकर घारे यांनी आज शुक्रवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सुधाकर घारे यांच्या पक्ष कार्यालयापासून ढोलताशांच्या गजरात व मी सुधाकर घारे...देवमाणूस, अशा टोप्या घातलेल्या समर्थकांसह रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, अशोक भोपतराव, भरत भगत, अंकीत साखरे, नमिता सुधाकर घारे, सुरेखा खेडकर, संतोष बैलमारे, भगवान भोईर, भगवान चंचे, मनीष यादव, वैशाली जाधव, रंजना धुळे आदींसह असंख्य कार्यकर्ते, समर्थक सहभागी झाले होते. 

कर्जत-खालापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 10 ते 15 हजार समर्थकांच्या गर्दी सुधाकर घारे यांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत मला कुणाचेही आव्हान नाही तर माझेच विरोधकांना आव्हान आहे. अर्ज भरताना 30 हजारांहून अधिक लोक माझ्यासोबत असल्यामुळे ही निवडणूक मी जिंकणार, असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी व्यक्त केला.


Post a Comment

Previous Post Next Post