युवाशक्तीची ताकद दाखविण्यासाठी युवकांशी संवाद

 

* आ. महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी युवा सेना सज्ज 

कर्जत / प्रतिनिधी :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेनेची बैठक कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवा सेना प्रमुख अमर मिसाळ, विधानसभा प्रमुख युवासेना प्रसाद थोरवे, जिल्हा सचिव युवासेना संदीप भोईर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधला.

या दौऱ्याप्रसंगी संवाद साधताना रायगड जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोककल्याणासाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत याची माहिती दिली व कर्जत-खालापूर मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकेल व आमदार महेंद्र थोरवे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला व पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील असा विश्वास व्यक्त केला. 

याप्रसंगी बोलताना युवा सेना सचिव रुपेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १८ तास काम करत आहेत व त्यांच्याच विचाराने आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत-खालापूरचा विकास केला आहे, ज्यामध्ये अप्रतिम अशी विठ्ठलाची मूर्ती उभारलेली आहे मुंबईकरांना नेहमी कर्जतला आल्यानंतर विठ्ठल मूर्तीचे दर्शन घ्यावेसे वाटते. आमदार साहेबांनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत जर पोहोचवली तर निश्चितपणे आमदार साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व युवा सेनेचा त्यामध्ये खूप मोठा वाटा असेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमप्रसंगी कर्जत-खालापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी व तरुणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रम प्रसंगी रायगड तालुकाप्रमुख संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, युवासेना रायगड जिल्हाप्रमुख अक्षय पिंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील, रायगड जिल्हा सचिव संदीप भोईर, विधानसभा प्रमुख युवासेना प्रसाद थोरवे, कर्जत युवा सेना प्रमुख अमर मिसाळ, प्रीतम सुर्वे, रोशन पवार, वैभव मोहिते, रोहित विचारे, प्रसाद देशमुख, जिब्राम मालदार, नितीन झांजे, नितीन बडेकर, स्वप्निल मते, जयवंत शिनारे, सनी चव्हाण, विनायक घरत, अर्चना लाड, वैभव बोराडे, रोहित पाटील, सोहम पाटेकर, आशिष मिनमिणे, मुकेश रूपवते, ऋषिकेश पाटील, ऋषिकेश बैलमारे, सुरज साळवी, प्रगती कराळे, राजू सैरासे, बिपिन बडेकर तसेच युवा सेनेचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post