सुभाषनगर संरक्षण भिंतीचे श्रेय जेष्ठ पत्रकार ओव्हाळ यांचेच !

 


* आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान

* वासरंग-लौजी रस्त्यावरील उघडा चेंबर मृत्यूचा सापळा 

* झाकण लावण्यासाठी नगर परिषदेकडे फंड नाही का ? 

खोपोली / खलील सुर्वे :- सुभाषनगर संरक्षण भिंती बांधण्यासाठी 3 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या संरक्षण भिंतीसाठी जेष्ठ पत्रकार कै. हनुमंतराव ओव्हाळ यांनी जिवाची बाजी लावली होती, त्यामुळे याचे श्रेय त्याचेच आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी दिली आहे. 

खोपोली नगर परिषद कार्यालयासमोरून जाणाऱ्या वासरंग-लौजी या मुख्य रस्त्यावर रेल्वे गेटसमोर रस्त्यावर पिण्याच्या पाण्याचा व्हॉल असलेला भला मोठा उघडा चेंबर थेट अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. एकतर रात्री-संध्याकाळी अंधारामु‌ळे हे चेंबर दिसत नाही आणि त्यातही पावसामध्ये तर मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.


चेंबर गेल्या अनेक वर्षांपासून उघडा ठेवण्यात आल्याने अपघाताला आयते आमंत्रण मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या उघड्या चेंबरमुळे या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनाला अनेक अपघात झाले आहेत. या परिसरात महिंद्रा कंपनी, लौजी रेल्वे स्टेशन, वसतीगृह आहे आणि रस्ता रहदारीचा असल्याने दिवसरात्रं वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच रात्रीच्या वेळी नेमक्या चेंबरच्या आसपास खूप कमी उजेड असतो आणि त्यामुळे अपघाताची भीती आणखी वाढली आहे.

नवरात्रीसारखे सणाचे दिवस सुरु असून दांडिया उत्सव साजरा करून रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्यांना हा उघडा चेंबर दिसून येत नाही त्यामुळे रस्ताच आहे, या भ्रमात प्रवास केला कि वाहन चालक अपघाताला बळी ठरत असून गेल्या अनेक वर्षांपासून हे चेंबर उघडे असले तरी त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष नसल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले आहे. दररोज पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी पाणी सोडण्यासाठी व बंद करण्यासाठी जा-ये करत असतो. मात्र या उघड्या चेंबरवर लोखंडी झाकण बसविणे गरजेचे असल्याचे नगर परिषदेला का सांगत नाही ? नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामूळे या उघड्या चेंबरमध्ये आदळून वाहनांचे अनेक अपघात झाले व यात अनेक लोक जखमी झाले...काही अपंग झाले...आता एखादा मोठा अपघात झाला आणि पाच-दहा लोक मयत झाल्यावर या उघड्या चेंबरवर झाकण बसणार का?मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमधील साफसफाई  व संरक्षक भिंत दुरुस्ती करण्यासाठी  नगरपरिषदेकडे फंड  नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले मात्र या उघड्या चेंबरवर झाकण बसविण्यासाठी तरी नगर परिषदेकडे फंड उपलब्ध नाही का ? या प्रभागातील मधील आजी-माजी नगरसेवकांना हे उघडे चेंबर दिसून आलेच नाही का? यासाठी ही नागरिकांनी नगर परिषदेला तक्रार करावी का? अशी नाराजी व्यक्त करीत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


खोपोली नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर डोंगर कड्या येथील संरक्षण भिंत बांधण्यासाठी पत्रकार, जागृत नगरिक संघटनेने आंदोलन, उपोषण केले होते आणि कोट्यवधी रुपये मंजूर करवून घेतले. यात जेष्ठ पत्रकार कै. हनुमंतराव ओव्हाळ यांनी उपोषण केले होते. त्यांचा संघर्ष खूप मोठा होता आणि लोकप्रतिनिधी आम्ही फंड आणून काम केल्याचा गवगवा करीत आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधी श्रेय घेण्यासाठी पुढे येत प्रसिद्धी घेण्याचा जीवापाड प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या आजी-माजी लोकप्रतिनिधींना अनेक वर्षापासून रस्त्यावर असणारे उघडे चेंबर दिसलेच नाही का ? की यांच्या कार्यकाळामध्ये हे चेंबर बसविण्यासाठी फंड उपलब्ध नव्हता ? नगर परिषदेने लवकरात लवकर  या उघड्या चेंबरवर लोखंडी झाकण बसवावे व अपघात टाळावे.

- ग्यासुद्दीन खान

खोपोली शहराध्यक्ष आम आदमी पार्टी.

Post a Comment

Previous Post Next Post