* पाच वर्षापासून मी लढा लढत आहे - सारीका पिंगळे
खोपोली / प्रतिनिधी :- सुभाषनगर संरक्षण भिंत बांधण्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांनी 3 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. स्थानिक नगरसेविका म्हणून गेली 5 वर्ष मी हा लढा लढत आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने हा निधी मिळाला असून माझे व माझ्या शिवसेना पक्षाचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सारीका राजू पिंगळे यांनी व्यक्त केली.
नगरसेविका सारीका पिंगळे म्हणाल्या की, नगरसेविका झाल्यापासून मी माझ्या गावातील लोकांच्या जीवाची काळजी घेत आहे. दरड कोसळू नये यासाठी संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अशी वारंवार मागणी करीत होते. निधी मिळावा यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. आज आमच्या मागणीला यश आले असून 3 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल व पुढील कामासाठी अजून निधी मिळावा यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेन, असे आश्वासन नगरसेविका सारीका पिंगळे यांनी दिले.
सुभाषनगर परिसरात जो विकास दिसत आहे, तो माझ्या माध्यमातून झाला आहे. नगरसेविका म्हणून गावात अनेक विकास कामे मी मार्गी लावले आहेत. गावात पाणी आणले...ओपन जिम बनवली...बालवाडी जवळ जिम आणली...लग्नासाठी स्टेज बनविला...लहान मुलांसाठी गार्डन बनविले...आणि आता सुभाषनगर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 3 कोटी 50 लाख रूपयांचा निधी आणला. यापुढे ही गावाच्या विकासासाठी कटीबध्द आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सारीका राजू पिंगळे यांनी व्यक्त केली.
सुभाषनगर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 3 कोटी 50 लाख रूपयांचा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे सुभाषनगर ग्रामस्थवासी व माझ्याकडून खूप खूप आभार तसेच नगरसेवक मंगेश दळवी यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त करते.