बोरघाटात प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग

 

* सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बससह प्रवाशांचे सामान जळून खाक 

खोपोली / खलील सुर्वे :- रविवार, ६ ऑक्टोबर २०२४ राजी रात्री ७ वाजेच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर बोरघाटात ३३ प्रवाशांनी भरलेल्या एका प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही बस बेंगलोरहून जयपुरला जाण्यासाठी निघाली असता बस (क्र. AR01 T 7268)  बोरघाट उतरत असतांना बसचे लाईनर ब्रेक मारत असल्याने तापल्याने अचानट लाईनरने पेट घेतला.

बसला आग लागल्याचे दिसताच ताबडतोब बस रस्त्यावर उभी केली आणि सर्व प्रवासी बसमधून सुखरूप खाली उतरवले. त्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या बसमधून दोन चालक क्लिनर असे सुमारे ३३ प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र या आगीत बस व बसमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स, आयआरबी पेट्रोलियम  आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्थानी घटनास्थळी पोचून काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.

Post a Comment

Previous Post Next Post