घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सभासदांना लाभांश भेटवस्तूंचे वाटप

 


* महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था लि. चोपडा नागलवाडीचा उपक्रम

पुणे / अकबर पिंजारी :- चोपडा नागलवाडी येथील महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था लि. च्या वतीने आज नवरात्री उत्सव घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सर्व सभासद बंधू भगिनींना संस्थेचा लाभांश भेटवस्तु स्वरूपात नीलकमल खुर्ची देण्यात आली. 

यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र रामसिंग राजपूत, संस्थेचे संचालक प्रकाश मोहन राजपूत, प्रकाश रामा राजपूत, गोपाल त्रंबक राजपूत, खंडू डुमन सोनवणे, यशवंत पुंडलिक राजपूत, सुधाकर मंगा राजपूत, किशोर जानकीराम ओतारी, ज्ञानेश्वर एकनाथ पाटील, हंसाबाई अरविंद राजपूत, सीमाबाई उमेदसिंग राजपूत, संस्थेचे मॅनेजर निलेश वाघ यांच्या हस्ते संस्थेचे जेष्ठ सभासद मंगा मन्साराम राजपूत, विक्रम अभिमन पाटील, भरत राजपूत, विकास राजपूत, योगेश राजपूत, महिला सदस्या विद्याताई चौधरी यांना देऊन शुभारंभ करण्यात आला. 

Post a Comment

Previous Post Next Post