सुभाषनगर संरक्षण भिंतीसाठी 3 कोटी मंजूर

 

* कै. हनुमंत ओव्हाळ यांचा लढा ठरला निर्णायक 

* आ. महेंद्र थोरवे यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी

* मा. नगरसेवक मंगेश दळवी यांच्या प्रयत्नांना यश

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- सुभाषनगर व काजूवाडी येथील धोकादायक दरडीभोवती संरक्षण भिंत उभारण्यात यावी, यासाठी मागील 3-4 वर्षापासून जेष्ठ पत्रकार कै. हनुमंत ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली रायगड संघर्ष समिती, पोलीस मित्र संघटना व माजी नगरसेवक मंगेश दळवी सातत्याने पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री कार्यालयासह खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसिलदार, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदी विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले होते. ऐवढेच नव्हे तर अनेक वेळा आंदोलन, उपोषण, रैली, बैठका,  झाल्या होत्या. अखेर या लढ्याला यश मिळाले असून सुभाषनगर व काजूवाडी संरक्षण भिंतीसाठी 3 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती मा. नगरसेवक मंगेश दळवी यांनी दिली. 

याबाबत बोलतांना खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक व गटनेते मंगेश दळवी म्हणाले की, सुभाषनगर लगत असलेल्या धोकादायक दरडीभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला आहे, ही खरंच आनंदाची बाब आहे. या कामासाठी 3 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती कर्जत-खालापूर विधानसभेचे आ. महेंद्र थोरवे यांनी फोन करून दिली. आ. थोरवे यांनी सांगितले की, तुम्हाला आज लेटर पाठवून देतो. सदर कामाचा पाठपुरावा करण्यासाठी सुभाषनगरमधील जेष्ठ पत्रकार कै. हनुमंतराव ओव्हाळ, खलील सुर्वे, फिरोज पिंजारी, मानसी कांबळे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील व सर्व नगरसेवक यांची मेहनत आहे. 

मंगेश दळवी पुढे म्हणाले की, आ. महेंद्र थोरवे यांचे खूप खूप धन्यवाद... आमदार साहेब यांनी कमी वेळेत काम केल्याबद्दल आम्ही सुभाषनगर ग्रामस्थवासी त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आम्ही सर्व सुभाषनगर ग्रामस्थ आपणास विनंती करतो की, सदर काम लवकरात लवकर चालू करावे, असे आवाहन दळवी यांनी केले.

* कै. हनुमंत ओव्हाळ यांचा लढा ठरला निर्णायक :- मा. नगरसेवक मंगेश दळवी यांच्यासोबतच जेष्ठ पत्रकार कै. हनुमंतराव ओव्हाळ व त्यांच्या पत्रकार टीमने हा विषय अनेक वर्ष लावून धरला होता. अनेक वेळा उपोषण, आंदोलन करीत प्रशासनावर दबाव टाकला होता. निधी मंजूर झाल्याने कै. हनुमंतराव ओव्हाळ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तसेच आ. महेंद्र थोरवे, तत्कालीन प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल रायगड संघर्ष समिती व पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीचे रायगड जिल्हा महासचिव पत्रकार खलील सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post