आरपीआय (1956) सुभाषनगर शाखा कमिटीचे उत्साहात उद्घाटन

 

खोपोली / मानसी कांबळे :- धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमीचे औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) शाखा कमिटी सुभाषनगरचे उदघाटन समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष डॉं. राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.    

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे यांच्या हस्ते डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पुजन करण्यात आले तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. आरपीआय (1956) शाखा सुभाषनगर कमिटी स्थापन कार्यक्रम एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांच्या अतिषबाजीत पार पडला.   

या कार्यक्रमास आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे यांच्यासह कर्जत-खालापुर संपर्क प्रमुख नरेश जाधव, रायगड जिल्हा महिला प्रमुख सुरेखाताई पवार, रायगड जिल्हा संस्कार सचिव के.डी. खंडागळे, रायगड जिल्हा प्रवक्ता आर. एच. गायकवाड, रायगड जिल्हा संस्कार सचिव व्ही. जी. जाधव, खालापुर तालुका संस्कार सचिव राहुल गायकवाड, आरपीआय सदस्य संजय ओव्हाळ, मंगेश पवार, सुभाषनगर ग्रामशाखा सुभाषनगर आरपीआय (1956) अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष शशिकांत सोनावणे,सदस्य सुरज गाडे, सदस्य रविंद्र पगारे, आरपीआय (1956) महिला अध्यक्षा प्रमिला कदम, सचिव शिल्पा गायकवाड, सदस्या शांता कवडे, सीमा सोनावणे, प्रियंका कांबळे, मनिषा महापुरे, आरती गायकवाड, कविता गायकवाड तसेच सुभाषनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post