खोपोली शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार

 

* खोपोली उपशहर प्रमुख तौफिक पटेल यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

खोपोली / प्रतिनिधी :- बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे नुकताच पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खोपोली शहरातील पहिल्या हाल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खोपोली उपशहर प्रमुख तौफिक पटेल यांच्यासह विभाग प्रमुख अख्तर मुल्ला,  ईम्रान वंडे, इरफान मुकादम, तारिक जळगावकर, नाजिम जळगावकर, गुफ्रान मुल्ला, अली कुरेशी, साजिद सोंडे, अर्जुन ओव्हाल, शोयेब धनसे, आतिफ बेडेकर, मुकरम अन्सारी, फय्याज मुकरु, मजिद करजीकर, मोबीन बेडेकर यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला.      

याप्रसंगी बोलताना शिवसेना पक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहात, आपल्याला पक्षामध्ये योग्य तो मानसन्मान दिला जातो. मी सदैव खोपोलीकरांच्या विकासासाठी कटीबध्द आहे अशा प्रकारचा शब्द आ. महेंद्र थोरवे यांनी दिला. 

याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, खालापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख भाऊ सणस, उपशहर प्रमुख मोहसिन खान, राजु खांडेकर तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post