कर्जत / प्रतिनिधी :- डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात नुकतीच रॉयल गार्डन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत सर्व बौद्ध बांधवांची तसेच राजकीय, सामाजिक व विचारवंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात सर्व बांधवांनी आपले मत मांडून योग्य तो पर्याय निवडला असून लवकरच बाबासाहेबांचा 13 फुटी स्मारक उभा राहणार आहे. नविन स्मारक उभे राहणार असल्याने कर्जत तालुक्यात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, रेखाताई ठाकरे, दशरथ शेठ भगत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.