खालापूर / सुधीर माने :- खालापूर जवळील वणवे गावातील रामचंद्र बालाजी जाधव, वसंत बालाजी जाधव, पांडुरंग बालाजी जाधव यांच्या मातोश्री वै. ह. भ. प. जनाबाई बालाजी जाधव यांचे शुक्रवार, दि.13 सप्टेंबर 2024 रोजी वृद्धापकाळाने वणवे येथे निधन झाले.
त्या खूप मायाळू, प्रेमळ होत्या. त्यांनी खूप कष्ट करून आपल्या तीन मुलांना व दोन मुली विठाबाई व कमळ यांचे पालन पोषण करून कुटुंब सांभाळले होते. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगांव येथे होणार आहे. तसेच उत्तरकार्य बुधवार, दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी वणवे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे व दोन मुली, नातवंडे व सुना असा मोठा परिवार आहे. त्याच्या अंत्यविधीस सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी व ग्रामस्थ हजर होते. यावेळी अनंत पाटील व सुधीर माने यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
