पाली / निवास सोनावळे :- डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी पालीचे माजी सचिव तथा शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असणारे प्राथमिक शिक्षक मोरेश्वर रमाकांत कांबळे यांच्या मातोश्री कालकथीत चंद्रभागा रमाकांत कांबळे यांचे दि. १७ रोजी (वय ८० वर्ष) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या अंत्यविधीला सुधागड तालुका तहसिलदार दिलीप रायन्नावार, गटशिक्षणाधिकारी बांगारे, रिपाइं नेते रवींद्रनाथ ओव्हाळ, आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, सुधागड तालुका बौद्धजन पंचायत अध्यक्ष भगवान शिंदे, माजी तालुकाध्यक्ष दिपक पवार, पाली नगरपंचायतीचे नगरसेवक सुधीर भालेराव, सुलतान बेनसेकर, नातेवाईक, शिक्षक वर्ग व आंबेडकरी चळवळीतील मान्यवर यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला.
कालकथित आई चंद्रभागा कांबळे स्वभावाने अतिशय प्रेमळ व मनमिळावू होत्या. त्यांच्या पाश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा जलदानविधी व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. २२ रोजी राहत्या घरी मौजे खवली येथे करण्यात येणार आहे.
