कर्जत तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच...

 


* दोन बंगल्याच्या आतमध्ये शिरून सोने, चांदीसह रोख रक्कम केली लंपास 

कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या ज्ञानदीप सोसायटी येथील दोन बंगल्यात घुसून चोरी करण्यात आली. एक बंगल्याची खिडकी तर दुसऱ्या बंगल्याच्या दरवाजाच्या लॉकची कडी तोडून आतमध्ये शिरकाव करीत सोने, चांदी यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे लंपास झाल्याची घटना समोर आली आहे.

ज्ञानदीप सोसायटी प्लॉट नंबर 3 येथे अर्जुन लक्ष्मण राणे यांच्या मालकीचे घर असून गेल्या 10 वर्षापासून ते या ठिकाणी राहत असून त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. घटनेनंतर त्यांनी सांगितले की, मी काल दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या 8 च्या दरम्यान नेहमी प्रमाणे हॉटेलवर गेल्यानंतर काम उरकून 10 वाजता रिटर्न आल्यावर माझ्या घराचा गेट उघडून समोरील असलेल्या दरवाजाची लॉकची कडी तोडून घरात शिरून बेडरूमच्या आतमध्ये असणाऱ्या कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोने, चांदी यांसह रोख रक्कम चोरट्यांनी चोरी करून मागच्या दरवाजाने प्रसार झाले. एकंदरीत एकाच रात्री दोन घरांपैकी एका घराची दरवाजाची कडी तर दुसऱ्या घराची खिडकी तोडून आत प्रवेश करीत चोरी करून मागच्या दरवाजाने पळ काढला. कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस चोरींच्या घटनेत वाढ होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post