कर्जत / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) पक्षाचा नुकताच कर्जत येथे कार्यक्रम झाला. यावेळी विजय दिलीप गायकवाड हे आरपीआय पक्षाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आहेत, अशी चर्चा करण्यात येत आहेत. अनेक बॅनर देखील लावण्यात आले होते. मुळात माझा किंवा माझ्या कुटुंबातील कुणाचाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी कोणताही संबंध नाही. मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असून मी नितीन सावंत यांना आमदार करण्यासाठी काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया ग्राम पंचायत आसल येथील रहिवासी तथा शिवसेना नेते विजय दिलीप गायकवाड यांनी व्यक्त केली.
कर्जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजय गायकवाड म्हणाले की, मुंबई येथे जात असताना माझी राजरत्न आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणून मी त्यांची भेट घेतली. परंतु मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) पक्षाचा रायगड युवक अध्यक्ष असल्याची चर्चा सुरू होती. परंतु मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांचा कट्टर समर्थक आहे. मी व शाखा प्रमुख समीर साळुंखे नितीन सावंत यांना आमदार करण्यासाठी काम करणार आहोत, असे ही शिवसेना नेते विजय दिलीप गायकवाड यांनी सांगितले.