* चिकणपाडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण
* रेशन कार्ड व घरपट्टी वादातून भावांमध्ये वाद
* नेरळ पोलिसांनी केली गुन्ह्याची उकळ
कर्जत / प्रतिनिधी :- नेरळ पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे चिकनपाडा येथे राहणारे मयत ३५ वर्षीय मदन पाटील यांच्या घरात गणपत्ती बाप्पा विराजमान झाला असताना, मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच मुलगा विवेक मदन पाटील यांचा मृतदेह हा घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती. या सापडलेल्या तिन्ही मृतदेहाच्या अंगावरील झालेल्या घावाच्या जखमा दिसत असल्याने हे हत्याकांड की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत असताना, मात्र पोलिसांना हे हत्याकांड असल्याचा संशय असल्याने या तिहेरी हत्याकांड प्रकरणी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा टेळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पाच टीम तसेच अलिबाग गुन्हे अन्वेषण पथक यांच्या माध्यमातून तपासाची सूत्रे ही वेगाने फिरवत सदर तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील याला पोलिसांनी चौकशी करीता ताब्यात घेत व सदर गुन्हयाची उकळ होण्याकामी त्याची पत्नी व एका मित्राला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या तपास व चौकशी दरम्यान अखेर सख्खा लहान भाऊ हणमंत पाटील याने रेशनकार्ड व घरपट्टी वादातून झोपेत असलेला मोठा भाऊ, सात महिन्याची गरोदर वहिनी व लहान पुतण्या यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी लहान भाऊ हणमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील चिकनपाडा गाव हद्दीत येणाऱ्या पोशिर नदी येथे दसपिंडाच्या विधीसाठी सकाळच्या १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ जात असताना त्या ग्रामस्थांना पोशिर नदीला मिळणाऱ्या ओहळामध्ये एका ८ वर्षीय लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आल्याने पोशिर गावाचे पोलिस पाटील राहुल राणे यांनी या घटनेची खबर नेरळ पोलिस ठाण्यात दिली असता, नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक शिवाजी ढवळे, पोलिस उपनिरीक्षक दहातोंडे व कर्मचारी स्टापसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या मुलाचा मृतदेह हा त्याच्या घरी आणला असता, घरात गणपती बापाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली असल्याचे दिसून आले. परंतु घरात त्या मुलाचे आईवडिल दिसत नसल्याने त्यांना फोन केला असता, त्यांचे मोबाईल फोन हे घरात सापडून आले. मात्र, आईवडील घरात सापडून आले नसल्याने पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी घराशेजारी असलेल्या ओहळामध्ये शोध घेतला असता, ज्या ठिकाणी लहान मुलाचा मृतदेह सापडला होता. त्या परिसरात काही अंतरावर एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत त्याच्या आईचा मृतदेह व वडिलांचा ही जवळ पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत सापडल्याने व आई व वडिल यांच्या कानावरती तसेच मुलगा याचे डोक्यावरती व गुप्त अंगावरील घाव व जखमा दिसून आल्याने, सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना देताच घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी व त्यांच्यासह पेण उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांनी घटनास्थळाला भेट देत घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्र वेगाने फिरवत वेगवान तपासकामी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिसांच्या पाच टीम नियुक्त करून मुख्य तपास हा गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांच्याकडे देण्यात आल्याने कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे, नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे व नेमण्यात आलेल्या पोलिसांच्या पाच टीम सह गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी सदर एकाच कुटूंबातील झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी मयत महिलेचा भाऊ रुपेश यशवंत वेहले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १८४ /२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३ (१), २३८ अन्वये गुन्हा नोंद करून मयत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील याला प्रथम दर्शनी मुख्य संशयीत म्हणून चौकशी दरम्यान ताब्यात घेण्यात आले.
या गुन्हयाची लवकरात लवकर उकल होण्यासाठी व तपासाची साखळी जोडण्यासाठी मुख्य संशयीत हनमंत पाटील याची पत्नी रेशमा पाटील व एका मित्राला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान मुख्य संशयीत आरोपी हणमंत पाटील हा उडवाउडवीची उत्तरे देत मोठा भाऊ, वहिनी व पुतण्या यांच्या मृत्यूचे दुःख झाल्याचे भासवत मी माझ्या पत्नीला व मुलाला तिचे माहेरी पाठवून मी पोशिर येथे चुलत मामाकडे गणपती असल्याने गेलो होतो व मी रात्री मामाकडे राहिलो असल्याचे सांगत होता. परंतु या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नियुक्त पोलिस टीमने पोशिर गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी भाऊ हणमंत पाटील हा रात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने व संशय बळावल्याने त्याची कसून चौकशी केली असता रेशनकार्ड व घरपट्टीच्या वादातून मोठा भाऊ मदन पाटील, वहिनी अनिषा पाटील व पुतण्या विवेक पाटील हे झोपेत असताना व गणपती घरात असल्याने दरवाजा आतून खुला असल्याचा फायदा घेत धारदार कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार करून ते मेल्याची खात्री झाल्यावर एक एक करून तिन्ही मृतदेह घराजवळील ओहळात टाकून घरातील साफसफाई करून अंथरूण व माझ्या अंगावरील शर्ट हे ओहळात टाकून शर्ट बदलून पोशिर येथे चुलत मामाच्या घरी परत गेल्याची कबूली दिली असल्याने चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात मृत मदन याचा सख्खा लहान भाऊ आरोपी हणमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांची अवघ्या ३६ तासांत उकळ करण्याकामी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा टेळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळ पो. ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जाधव, नियंत्रण कक्षाच्या सपोनी मनिषा लटपटे, पोसई सरगर, पोसई नरे, पोसई गोसावी तसेच परिविक्षाधिन पोलिस उपनिरिक्षक गजे, पोसई घोलप, पोसई नवले, पोसई देवकाते, पोसई केंद्रे, पोसई अनुसया ढोणे, सहा. सौज राजेंद्र पाटील, प्रसाद पाटील, यशवांत झेमसे, सांदीप पाटील, पोहवा सुधीर मोरे, प्रतिक सावंत, जितेद्र चव्हाण, तवकास खैरनार, राकेश म्हात्रे, प्रसन्न जोशी अस्मिता म्हात्रे, भाग्यश्री पाटील, अभयंती मोकल, पोशि अक्षय पाटील, स्वामी गावांड, मोरेश्वर ओमले, जगताप चालक पहेलकर, थळ तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोसई किसवे, पोह वाघमारे, पोह दकसवे, पोह वाणी, पोशि केकान, पोशि दवणे, पोशि वागणेकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.