खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील युवा कार्यकर्ती व महिलांचा आवाज असलेली मुस्कान खालिद सय्यद यांची नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीच्या कर्जत-खालापूर विधानसभा अल्पसंख्यांक विभाग महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्यांक विभाग महासचिव महाराष्ट्र प्रदेश जैब्बूनीसा हमिद शेख, कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख हमीद शेख, अल्पसंख्याक विभाग खालापूर तालुका अध्यक्ष अमीर शेख, खालापूर तालुका महिला अध्यक्ष फरीदाताई शेख, खोपोली शहर महिला संपर्क प्रमुख पौर्णिमाताई गायकवाड आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर मुस्कान सय्यद यांनी ऐवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब, अल्पसंख्यांक विभाग महासचिव महाराष्ट्र प्रदेश जैब्बूनीसा हमिद शेख यांचे आभार मानत पक्ष घराघरात पोहचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.