डॉं. सुनील पाटील : खालापूरकरांच्या मनातील आमदार

 

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. दिवाळीच्या जवळपास विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यंदा कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. पण या सर्वात प्रसिद्ध, वलयांकीत चेहरा कुणाचा असेल तर तो आहे डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचा... खोपोली-खालापूरकरांच्या मनातील आमदार म्हणून डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. 

डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि विकास (काम) यांचे एकमेकांशी घट्ट संबंध आहेत. एक नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष असतानाही खोपोली शहरातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वार्डासाठी डॉं. सुनील पाटील नेहमीच धावून गेले आहेत. मागील काही वर्षांत खोपोली शहरात सर्वांधिक विकासकामे डॉं. सुनील पाटील यांच्याच प्रभागात झाली आहेत. नगराध्यक्ष असताना डॉं. सुनील पाटील यांनी खोपोली शहरात विकासगंगा आणली होती. आजच्या प्रगतशील खोपोलीत डॉं. सुनील पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कार्यकाळातच खोपोलीच्या विकासाची गाडी रूळावर आली पण मागील काही महिन्यांपासून या विकासगाड्याचे चाक पुन्हा गाळात रूतले आहे. खोपोलीचे विकासचक्र पुन्हा गतीमान होण्यासाठी तसेच कर्जत-खालापुर तालुक्याच्या विकासासाठी डॉं. सुनील पाटील आमदारपदी विराजमान होणे काळाची गरज निर्माण झाली आहे. 

रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, शौचालये, बागबगीचे (गार्डन), पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले व बेरोजगार तरूण सर्वांचा विचार करीत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉं. सुनील गोटीराम पाटील नेहमीच तत्पर असतात. माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली शहर प्रमुख, कर्जत - खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख, कट्टर - निष्ठावान शिवसैनिक, कार्यसम्राट नगरसेवक अशी डॉं. सुनील गोटीराम पाटील यांची ओळख आहे.

कर्जत - खालापुर विधानसभा मतदार संघ झाल्यापासून कर्जत तालुक्यालाच आमदारकी मिळाली आहे. खोपोली शहराला हा बहुमान मिळवून देण्याची धमक डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्यात असल्याने आमदार म्हणूनही डॉं. सुनील पाटील यांच्याकडे खोपोली व खालापूरकर पाहत आहेत. आज डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचा वाढदिवस...अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन, रायगड संघर्ष समिती, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत), स्वाभिमानी मीडिया असोसिएशन, व्हॉईस ऑफ मिडीया, केपी न्यूज चैनल, दैनिक कोकण प्रजा, इंटरपोल & कोकण प्रवाह वेब पोर्टलच्या वतीने डॉं. सुनील गोटीराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post