माथेरान येथे वाहतुकीची घोड्यांसाठी विशेष कार्यमोहिम

 


रायगड / नरेश जाधव :- २७ सप्टेंबर २०२४ रोजी माथेरान येथील पशुवैद्यकीय दवाखाना माथेरान तसेच पशुसंवर्धन विभाग रायगड आणि पिपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स - इंडिया (PETA-India) व रहात हया सेवा भावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीच्या घोड्यांसाठी विशेष कार्य मोहीम आयोजित करण्यात आली होती. ही विशेष कार्यमोहिम ही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा रायगड डॉं. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉं. शामराव कदम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉं. गिरीश बारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

माथेरान येथील विशेष कार्यमोहिमेमध्ये माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे घोडे व इतर घोडे असे एकूण १४३ घोडे यांची सविस्तर आरोग्य तपासणी, औषध उपचार, जंतनिर्मूलन, लसीकरण यांसह इतर तपासण्या करण्यात आल्या.

या कार्यमोहिमेप्रसंगी रहात हया सेवा भावी संस्थेचे डॉं. राकेश चिटोरा, डॉं. आकाश जाधव, पेटा-इंडिया हया संस्थचे महेश त्यागी व त्यांचे इतर सहकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कर्जत डॉं. मिलिंद जाधव, पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना माथेरानचे डॉं.अमोल कांबळे, ड्रेसर राम तिटकारे व इतर जणांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कार्य मोहिमेत, अश्वपालक यांना जंतनिर्मूलन, लसीकरणचे महत्व व इतर विषयांवर सविस्तर मार्गदर्शन देखील करण्यात आले. स्थानिक अश्वपालक यांनीही सदर विशेष कार्यमोहिमेस उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post