कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्याच्या वतीने विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यालयात कर्जत विधानसभेतील 362 बुथ अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार गोवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे आणि कर्जत विधानसभेचे निरीक्षक तथा गोव्याचे आमदार संकल्प अमोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला मोठ्या प्रमाणावर बुथ अध्यक्षांनी हजेरी लावली होती.
या बैठकीत बुथ स्तरीय कामांची चर्चा झाली तसेच पुढील काळात विधानसभेच्या निवडणुकीत बुथ अध्यक्षांनी जबाबदारीने काम करण्याच्या कामांची चर्चा झाली. यावेळी लोकसभेचे कोकण क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाशी कोळी, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेश भगत, कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे, उत्तर रायगड अध्यक्ष किसान मोर्चा अतुल बडगुजर, उत्तर रायगड चिटणीस रमेश मुंडे, खोपोली मंडळाचे अध्यक्ष रमेश रेटरेकर, खालापूर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मोरे, महिला मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनीताई पाटील, उपाध्यक्ष स्नेहा गोगटे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष नम्रता कांदळगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर, बीजेपी खालापूर प्रभारी नितीन कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती नरेश पाटील, कर्जत मंडळाचे सरचिटणीस संदीप मस्कर, वसंत महाडिक, प्रसाद पाटील, सुनील नांदे, विजय जिंनगरे, दिनेश भरकले, संजय कराळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.